Monday, February 03, 2014

भविष्य कुठल्या कारणामुळे चुकते??

वर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर 
मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्धास्थान' असलेल्या आदिनाथ साळवी सरांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच. जाहिरातीत भाकित खरे ठरल्याचा एखाद्या व्यक्तिचा अनुभव असतो. जर विवाह होणार असेल तर कुठे? कधी?कोणाशी? जोडीदाराचा स्वभाव कसा असेल? तो नोकरी का व्यवसाय करत असेल? त्याचे रंग रुप व्यक्तिमत्व आर्थिक परिस्थिती कशी असेल? विवाह नात्यात होईल का? प्रेमविवाह, पळून जाउन कि ठरवून? तो जातीचा असेल की परजातीचा? विवाहास जास्त खर्च तर येणार नाही ना? तो बिजवर व्यसनी नंपुसक, लफंगा तर नसेल ना? तो दीर्घायु आरोग्यसंपन्न आहे का? घरातील माणसांशी पटेल ना? ग्रहदोष दूर होउन वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी अत्यावश्यक धार्मिक उपाय, उपासना व प्रार्थना कोणती करावी? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात असतात. ते जाहीरातीत लिहिले असतात. जाहिरातीत हल्ली पुढे असेही लिहिले असते कि खालील कारणाने सांगितलेले भविष्य चुकीचे ठरु शकते

१) आपण दिलेली जन्मतारीख,वेळ,ठिकाण चुकीचे असेल तर
२) सांगितलेले उपाय,उपासना व प्रार्थना आमच्याकडून केलेली नसेल तर
३) बाहेरुन केलेले उपाय, उपासना, व प्रार्थना यांच्या परिणामांची जबाबदारी आमची नाही
४) भविष्य पहाताना साडेसाती,चौथा,सातवा,आठवा शनी असेल तर
५) विश्वास व श्रद्धा नसेल तर
आता समजा एखाद्या जातकाने अशा ज्योतिषाकडून भविष्य लेखी जरी घेतले व ते खरे ठरले नाही तरी वरील पाच पैकी कुठल्या तरी मुद्याच्या कचाट्यात तो सहज सापडलेला असतो. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी ज्योतिषावर येत नाही.ज्योतिषाची जाहिरात करणे अद्याप कायद्याने गुन्हा नाही. जादूटोणा विरोधी कायदाही याला काही करु शकत नाही. कारण त्यात ज्योतिषाचा समावेश नाही. राहिला प्रश्न दाव्याचा. त्यातून तर वर डिस्क्लेमर टाकून सुटका केली आहेच. शिवाय अनेक वस्तु व सेवा अव्वाच्या सवा दावे जाहिरातीत करत असतात. आपण ते गांभीर्याने घेत नाही.त्याला मार्केटिंग स्किल म्हणतो. ज्योतिष हे पण एक प्रॉडक्ट आहे.अमेरिकेत काही स्टेट मधे ज्योतिषाचा व्यवसाय करण्यास बंदी आहे.काही आपल्याकडील काही चलाख लोक जिथे बंदी नाही तिथे वैदिक ज्योतिष व्हिजिटिंग प्रोफेशनल म्हणुन व्यवसाय करतात.आमचे एक ज्योतिष स्नेही म्हणायचे की अहो जरी भारतात समजा कायद्याने ज्योतिषावर बंदी आलीच तरी लोकच मागल्या दाराने ज्योतिषाकडे येतील. त्यांच म्हणण अगदी खर आहे.सर्वसामान्य लोकांना ज्योतिषाची गरज लागणारच नाही अशी सामाजिक परिस्थिती आपल्याकडे निर्माण होउ शकते का?

2 comments:

Unknown said...

correct.... how can one human being predict about life of any other human being.... if god would have gifted such talent to some people then so many issues and problems would have been avoided...people should use little common sense before going for such things... no individual is special... god has made everyone same and equal... no human being can have a power to understand what god has planned for us...

Anonymous said...

https://youtu.be/biXYkQgOR0c

ज्योतिषालंकार श्री. श्री. भटांचा Youtube वरील वर Post केलेला Video जरुर बघा. आणि काही धंदा करणार्‍या ज्योतिषांमुळे संपुर्ण शास्राला नावे ठेवु नका.ज्योतिषाचा मुळ उद्देश हा भविष्य सांगणे नसुन, एखादे कार्य करण्यासाठी काळ अनुकुल आहे का प्रतिकुल आहे, हा आहे. डोंगरी रस्त्यावर पुढे वळण आहे, अशा प्रकारचे धोक्याची सुचना देण्याचे काम ज्योतिष करु शकते.